बँकेने तुमची २००० रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (१९ मे) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला.
2000 rupee note
2000 rupee noteEsakal

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (१९ मे) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबतच ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडे असलेल्या नोटा बँकेतून बदलून घ्याव्यात असे आरबीआयने यावेळी सांगितले आहे. या निर्णयाबाबत कित्येक प्रश्न लोकांच्या मनात आहेत, या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

१. हा निर्णय का घेण्यात आला?

२०१६ साली दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. त्यापूर्वी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी या नोटा आणल्या गेल्या होत्या. पुढे २०१८-१९ मध्ये या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरबीआयच्या असं निदर्शनास आलं, की दोन हजारांच्या या नोटा दैनंदिन व्यवहारासाठी अगदी कमी प्रमाणात वापरण्यात येत आहेत. तसेच, इतर मूल्यांच्या नोटांचा साठा हा लोकांची चलनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळेच सरकारच्या क्लीन नोट धोरणानुसार या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२. या नोटा व्यवहारात वापरू शकतो का?

नक्कीच. अजूनही तुम्ही २००० रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारांसाठी वापरू शकता. मात्र, ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी या नोटा बँकेतून बदलून घ्याव्यात असं आवाहन आरबीआयने केलं आहे.

३. तुमच्याकडे असलेल्या नोटांचं काय करावं?

तुमच्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा तुम्ही तुमच्या बँकेत जमा करू शकता. हे पैसे तुमच्या खात्यात जोडले जातील, किंवा तुम्हाला तेवढ्या मूल्याच्या दुसऱ्या नोटा दिल्या जातील. नोटा एक्सचेंज करून हव्या असल्यास तुम्ही आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये देखील जाऊ शकता. २३ मे पासून तुम्ही या नोटा बँकांमध्ये जमा करू शकता.

६. बँकेत नोटा जमा करण्यावर काही निर्बंध आहेत का?

तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करायचे असल्यास त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तुम्ही कितीही नोटा बँकेत जमा करू शकता. अर्थात, तुम्हाला यासाठी केवायसी आणि बँकेच्या नियमांचे पालन करावे लागेल.

नोटा बदलून हव्या असल्यास मात्र तुम्हाला एका वेळी केवळ २० हजार रुपये मूल्याच्या नोटा बदलून मिळतील. म्हणजेच दोन हजार रुपयांच्या केवळ दहा नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता.

2000 rupee note
RBI withdraws Rs 2,000 notes: बँकेत नोटा जमा करताय? खबरदार! 'सीए'नी दिला इशारा

७. बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला तर काय?

बँकेने तुमच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास, किंवा जमा करण्यास नकार दिला तर तुम्ही संबंधित बँकेच्या मॅनेजर किंवा मुख्यालयात तक्रार दाखल करू शकता. यानंतर ३० दिवसांच्या आत कोणतीही बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, किंवा बँकेने केलेल्या कार्यवाहीवर तुम्ही समाधानी नसाल; तर तुम्ही आरबीआयकडे दाद मागू शकता.

यासाठी तुम्ही आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) जाऊन, एकात्मिक लोकपाल योजने अंतर्गत तुम्ही बँकेची तक्रार नोंदवू शकता.

८. कोणत्या बँकेतून बदलता येतील नोटा?

तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही बँकेतून आपल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला त्या बँकेचे ग्राहक असण्याची आवश्यकता नाही. मात्र, बदलून घेताना तुम्हाला दहा नोटांची मर्यादा असणार आहे.

याव्यतिरिक्त तुम्ही बँकांच्या बिझनेस करस्पाँडंट्सच्या माध्यमातूनही नोटा बदलून घेऊ शकता. मात्र, यासाठी दिवसाला चार हजार रुपयांची मर्यादा लागू करण्यात आली आहे.

2000 rupee note
Notes 2000 : २ हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो ?

९. २० हजार रुपयांपेक्षा जास्त गरज असल्यास?

बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी सध्या २० हजार रुपयांची मर्यादा लावण्यात आली आहे. मात्र, जर तुम्हाला २० हजारांपेक्षा जास्त रुपयांची गरज असेल, तर त्या रकमेच्या नोटा तुम्हाला आधी आपल्या खात्यावर जमा कराव्या लागतील. खात्यावर पैसे डिपॉझिट झाले, की त्यानंतर तुम्ही हवी तेवढी रक्कम काढून घेऊ शकता.

१०. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी विशेष सोय असेल का?

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना आपल्या नोटा जमा करण्यासाठी वा बदलून घेण्यासाठी सोपं जावं यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.

2000 rupee note
RBI Decision on 2000 Note : हा नोटबंदीचा प्रकार नाही - विद्याधर अनास्कर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com