माजी क्रिकेटपटूच्या अभिनेत्री पत्नीला मारहाण

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांना 'ठक ठक गँग'ने मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत परिसरात घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

फरहीन कामानिमित्त शनिवारी (ता. 19) साकेत मॉलमध्ये गेल्या होत्या. सिग्नलला मोटार थांबली असताना ठक ठक गँगच्या चोरांनी त्यांना ठोसा मारला व त्यांचा मोबाईल आणि पर्स चोरुन तेथून पळ काढला. पर्समध्ये रोख 16 हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे होती. या दुखापतीमुळे फरहीन यांना अॅस्थमाचा झटका आल्याने त्या रस्तावर पडल्या. एका लष्करी अधिकाऱयाने मदत करत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फरहीन प्रभारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, फरहीन यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून  त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. आपल्या कुटुंबासह त्या दिल्लीत राहत आहेत.

Web Title: Farheen Prabhakar robbed assaulted at Delhi traffic signal