
थोडक्यात
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये आज सकाळी ६ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला.
भूकंपामुळे घाबरलेले लोक साखर झोपेतून जागे होऊन घराबाहेर धावले, पण कोणतेही नुकसान झाले नाही.
भूकंपाचे केंद्र फरिदाबादच्या नैऋत्येस १६ किमी अंतरावर आणि ५ किमी खोलीवर होते, असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नोंदवले.
Faridabad Earthquake : हरियाणामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास फरिदाबादला ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये हे धक्के बसले. जेव्हा अर्ध्याहून अधिक लोक घरात साखरझोपेत होते तेव्हा अचानक भूकंप झाला आणि यामुळे एकच गोंधळ उडाला.