
Uttar Pradesh Shocker Six Dead After Farmer Sets House on Fire
Esakal
शेतात पेरणीसाठी बोलावलेल्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्यानंतर कुटुंबाला एका खोलीत बंद करून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेत हत्या झालेल्या दोन मुलांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बहराइच इथल्या निंदुनपुरवा टेपरहा गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्यानंतर घाबरून कुटुंबियांना खोलीत बंद करून आग लावली.