esakal | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar rahul gandhi

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय ढळलेला नाहीये. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. चर्चेच्या अनेक बैठका होऊनही अद्याप तोडगा निघाला नाहीये. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून पहायला मिळाला. यादरम्यानच आता विरोधी पक्षांच्या प्रतिनधींचे एक मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सीपीआय(एम) चे महासचिव सीताराम येच्यूरी यांच्यासह पाच नेते उद्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. कोविड-19 च्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींना फक्त पाचच नेत्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. 

हेही वाचा - राज्यपाल कोश्यारी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; अवमान कारवाईला स्थगिती

राष्ट्रपतींशी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या भेटीची माहिती सीताराम येच्युरीने दिली आहे. कृषी कायद्याच्या मुद्यावरुनच ही भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. गेल्या 13 दिवसांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने कृषी कायदे परत घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उद्या शेतकरी आणि सरकारच्या दरम्यान चर्चेची सहावी फेरी होणार आहे. आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत मात्र, अद्याप योग्य तोडगा निघाला नाहीये. आज शेतकरी नेत्यांची गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक आहे. ही बैठक आज मंगळवार सायंकाळी सात वाजता होणार आहे. उद्या राष्ट्रपतींसोबत होणाऱ्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, सीपीआयचे सीताराम येच्यूरी, सीपीआयचे डी राजा आणि डीएमकेचे टीकेएस एलनगोवन असणार आहेत.

loading image