Farmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा मरु'चा नारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

शेतकऱ्यांसोबतच्या सरकारच्या नवव्या बैठकीतही कोणता तोडगा निघू शकलेला नाही.

नवी दिल्ली- शेतकऱ्यांसोबतच्या सरकारच्या नवव्या बैठकीतही कोणता तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांनी आपली मागणी कायम ठेवत सरकारला काही तोडगा काढण्याची इच्छा नाही, असं म्हटलं आहे. सरकारला कायदे मागे घेण्याची इच्छा नसेल, तर त्यांनी तसं सांगावं, आम्ही परत जाऊ. शेतकऱ्यांनी यावेळी 'करेंगे या मरेंगे'चे पोस्टर दाखवले. शेतकरी आणि सरकारमधील पुढील बैठक 15 जानेवारीला होणार आहे.

शुक्रवारच्या बैठकीत सरकारने शेतकरी नेत्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यास सांगितलं. पण, शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या 40 संघटनांचे नेते मिळून घेतील. सरकार आम्हाला कोर्टात जाण्याचा सल्ला देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टात 11 जानेवारीला महत्त्वाची सुनावणी होईल. जोपर्यंत सरकार तिन्ही कृषी कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असं शेतकरी म्हणाले आहेत. 

शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं की ते आपल्या मागण्यापासून मागे हटणार नाहीत. शेतकरी नेते बलवंत सिंह यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला. त्यांनी आपल्या डायरीवर पंजाबीमध्ये 'करेंगे या मरेंगे' लिहिलं होतं. शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे स्पष्ट होतंय की सरकारने जरी चर्चा लांबवण्याचा प्रयत्न केला, तरी ते मागे हटणार नाहीत. सरकार चर्चा लांबवून शेतकऱ्यांना थकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest round of talk fail decided to hold next meeting on 15th Jan

Tags
टॉपिकस
Topic Tags: