
अनेक ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रूधुराचा वापर केला.
नवी दिल्ली- आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसाचार झाला आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रूधुराचा वापर केला. दरम्यान, दिल्लीतील आयटीओ येथे मोठा गोंधळ झाला. उत्तराखंड येथे राहणारा एक शेतकरी नवनीत सिंग यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'हिंदुस्थान'ने दिले आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 'एनडीटीव्ही'शी बोलताना काही आंदोलकांनी हा आरोप केला. परंतु, या वृत्तास अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव नवनीत सिंग असून तो उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील बाजपूर गावातील रहिवासी आहे. त्याचे वय 30 वर्ष असल्याचे सांगण्यात येते. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नवनीत सिंगचा मृतदेह आयटीओ चौकात ठेऊन आंदोलन सुरु केले आहे. गोळीबार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा- Tractor Parade: दिल्ली पोलिसांची 'गांधीगिरी', आंदोलकांनी ऐकलं नाही म्हणून अधिकारीच बसले रस्त्यावर
Police use tear gas shells to disperse the protesting farmers at ITO in central Delhi. #FarmersLaws pic.twitter.com/FiF68Q0cVM
— ANI (@ANI) January 26, 2021
दरम्यान, दिल्लीतील अनेक भागात हिंसाचार होत आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसले आहेत. आंदोलकांनी निशाण साहिब आणि शेतकरी संघटनांचे झेंडे लावले. परंतु, काही वेळातच पोलिसांनी हे झेंडे तेथून हटवले. याचठिकाणी दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात.
दरम्यान, दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र रस्त्यावरच बैठक मारली.
हेही वाचा- Tractor Parade:संतप्त शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक; पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न