पुरामुळे नुकसान झाल्याने बेळगावमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

पुरामुळे नुकसान झाल्याने बेळगावमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

बेळगाव - पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने निराश शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली. मारुती नारायण राक्षे ( वय 60,रा. मारुती गल्ली आंबेवाडी) असे त्याचे नाव असून मंगळवारी (ता.1) रात्री ही घटना घडली आहे.

मारुती यांच्या शेतातील भात आणि बटाटा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते गेल्या आठ दिवसापासून मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी सोमवारी (ता.30) सकाळी नऊच्या सुमारास विष प्राशन केले. ही घटना कुटुंबियांच्या निदर्शनास येताच मारुती यांना अत्यव्यस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात. पण, रात्री अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com