esakal | कष्टकऱ्यांची दैना संपेना! शेतकरी, कामगारांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 1 लाख 39 हजार 123 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

कष्टकऱ्यांची दैना संपेना! शेतकरी, कामगारांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशातील शेतकरी आणि कामगारांच्या दुःखामध्ये दिवसेंदिवस भरच पडताना दिसत आहे. मागील वर्षभरामध्ये शेतीक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या ४३ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) च्या अहवालातून पुढे आली आहे. साधारणपणे वर्षभराच्या काळामध्ये ३२ हजार ५६३ रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या असून आतापर्यंत झालेल्या एकूण आत्महत्यांमध्ये हे प्रमाण २३.४ टक्के एवढे आहे. याधी २०१८ मध्ये ३० हजार १३२ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. 

शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांमागील संकटांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. मागील वर्षभरामध्ये १०,२८१ लोकांनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये ५ हजार ९५७ शेतकरी आणि उत्पादक तसेच ४ हजार ३२ शेतमजुरांचा देखील समावेश आहे. देशात शेतकऱ्यांच्या १ लाख ३९ हजार १२३ आत्महत्या झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण हे ७.४ टक्के एवढे आहे, त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे केवळ ७.७ टक्के एवढे होते, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

हे वाचा - पंतप्रधान मोदींनीच सर्वात आधी दिली होती पीएम केअर्समध्ये देणगी

राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या (प्रमाण टक्क्यांमध्ये) 
देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात ३८.२ टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात १९.४ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. त्याखालोखाल असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये 10 तर मध्यप्रदेशात 5.3 टक्के प्रमाण आहे. छत्तीसगढ, तेलंगणात हेच प्रमाण 4.9 टक्के इतकं आहे. 

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 1 लाख 39 हजार 123 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये तब्बल 5 हजारांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 516 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. 

हे वाचा - पँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा

कष्टकऱ्यांनी मरणाला कवटाळलं
पश्‍चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मणिपूर, चंडिगड, दमण आणि दिवू, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये कोणत्याही शेतकऱ्याने अथवा कामगाराने आत्महत्या केली नसल्याचे आढळून आले आहे. या आत्महत्यांचा श्रेणीबद्ध विचार केला तर २०१९ मध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आत्महत्येचे प्रमाण हे २३.४ टक्के एवढे असून यानंतर गृहिणींचा (१५.४ टक्के) क्रमांक लागतो. स्वयंरोजगारावर अवलंबून असलेले (११.६ टक्के), बेरोजगार (१०.१ टक्के), व्यावसायिक आणि वेतनप्राप्त मंडळी (९.१ टक्के), शेतीमध्ये गुंतलेले विद्यार्थी आणि व्यक्ती (दोघे ७.४ टक्के) आणि निवृत्त मंडळी (०.९ टक्के) यांनीही मरणाला कवटाळल्याचे उघड झाले आहे.