शेतकरी स्वतःचे नुकसान करत आहेत - मनोहरलाल खट्टर

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

मंदसौर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सुरू आंदोलन
गेल्यावर्षी 6 जूनला मध्यप्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात 6 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेला एक वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (ता. 6 जून) दहा दिवस शेतकरी आंदोलन करणार आहेत. मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. आपले म्हणणे सरकारने ऐकावे यासाठी अनेक महिन्यांपासून मेहनतीने पीकवलेला शेतमाल रस्त्यावर फेकणार आहोत.

चंदीगड : मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलने सुरू आहेत. परंतु, या आंदोलनाला कसलाही अर्थ नसून केवळ सरकारचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे सगळ सुरू आहे. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली. गुरूवार पासून मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये शेतकरी सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. आजही देशातील विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी दुध, शेतामाल रस्त्यावर फेकून देत आंदोलन केल्याच्या घटना घडत आहेत.

या विषयी बोलताना खट्टर म्हणाले, "मध्यप्रदेशातील शेतकरी गुरुवारपासून विनाकारण सरकारच्या विरूद्ध आंदोलने करत आहेत. या शेतकरी संपामध्ये कसलाही मुद्दा नाही. शेतकरी दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून त्यांचेच नुकसान करत आहेत. सरकारचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे सगळ सुरू आहे."
 
मंदसौर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सुरू आंदोलन
गेल्यावर्षी 6 जूनला मध्यप्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात 6 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेला एक वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (ता. 6 जून) दहा दिवस शेतकरी आंदोलन करणार आहेत. मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. आपले म्हणणे सरकारने ऐकावे यासाठी अनेक महिन्यांपासून मेहनतीने पीकवलेला शेतमाल रस्त्यावर फेकणार आहोत.

दुधाची मिठाई बनवून गावांमध्ये वाटली.
पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापुर भागात आंदोलकांनी हजारो लिटर दुध रस्त्यावर सोडून दिले. तसेच उत्तर प्रदेशातील संभल भागात 10 दिवस दुधाची पुर्तताच केली नाही. परंतु, मध्यप्रदेशातील मंदसौर मधील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर फेकून न देता, त्याची मिठाई बनवून गावांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: farmers are harming themselves - khattar