शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा पटीने वाढले; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा

Farmers income increased tenfold
Farmers income increased tenfoldFarmers income increased tenfold

आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर दहापटीने वाढले आहे. आता प्रगतिशील शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन लोकांना शेतीची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून तेही समृद्ध होतील, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘किसान भागीदारी, प्राथमिक हमारी’ मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. (Farmers income increased tenfold)

सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी संबंधित योजनांशी संबंधित शेतकरी समृद्ध झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे. पाच ते सहा वर्षांत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते दहा पटीने वाढले आहे. हे शेतकरी (Farmer) ‘कृषी दूत’ म्हणून गावोगावी गेले तर शेतीचे अर्थकारण बळकट होईल, असे पीक विमा शाळेत संबोधित करताना तोमर म्हणाले.

Farmers income increased tenfold
पतीने पत्नीला सोडले प्रियकराच्या गावी; वडील भांडताहेत हुंड्यासाठी

शेतकऱ्यांच्या (Farmer) उत्पादनांना बाजारातील किमान आधारभूत किमतीपेक्षा चांगला भाव मिळत आहे. गहू व मोहरीला चांगला भाव मिळत आहे. मोहरीच्या तेलातील भेसळ बंद झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या हिताची अशी इतर पावलेही सरकार उचलणार आहे. ग्रामीण भागात कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एक लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी आठ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर झाले. साठवणूक व इतर सुविधांचा विकास करण्यात येणार आहे, असेही कृषिमंत्री तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले.

बागायती पिकांचे विक्रमी उत्पादन

एकेकाळी देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. हरितक्रांती यशस्वी करण्यात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यांनी मोठे योगदान दिले होते. आता देशात आवश्‍यकतेपेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादन होत असून बागायती पिकांचे विक्रमी उत्पादन होत आहे, असेही कृषिमंत्री तोमर म्हणाले.

Farmers income increased tenfold
नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप; बॉयफ्रेंडसह सख्या भावांचे कृत्य

शेतकरी अभिनंदनास पात्र

देशातून चार लाख कोटींहून अधिक किमतीची कृषी उत्पादने निर्यात झाली आहेत. त्याबद्दल शेतकरी अभिनंदनास पात्र आहेत. शेतकऱ्यांना सावकारांपासून दिलासा देण्यासाठी सात वर्षांपासून देशात किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवली जात आहे. पशुपालनही त्याच्याशी जोडले गेले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना १५ लाख कोटींचे कर्ज दिले आहे, असेही कृषिमंत्री तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com