"दिल्ली सीमेवरच अंत्यसंस्कार करा"; सूसाईड नोट लिहून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 2 January 2021

केंद्राच्या नव्या कृषी (Farm Laws) कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर (Farmers Protest) आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली- केंद्राच्या नव्या कृषी (Farm Laws) कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर (Farmers Protest) आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी असून सुद्धा शेतकऱ्यांनी माघार घेतली नसून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यातच दिल्ली सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गाजियाबादच्या यूपी गेटवर शौचालयामध्ये शनिवारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंह (वय 75) होते. सूसाईड नोट लिहित शेतकऱ्याने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. 

BREAKING : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींना ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये उपचार...

आत्महत्या केलेला शेतकरी उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचा रहिवाशी होता. त्यांनी मागे एक सूसाईड नोट सोडली आहे. भारतीय किसान यूनियनने म्हटलंय की, दुर्दैव आहे की यूपी गेटवर रामपूर जिल्ह्यातील सरदार कश्मीर सिंह यांनी शौचालयात आत्महत्या केली. त्यांनी आपल्या सूसाईड नोटमध्ये इच्छा व्यक्त केलीये की माझा अंत्यसंस्कार माझे नातू, मुले यांच्या हाताने दिल्ली-यूपी बॉर्डरवर व्हायला पाहिजे. 

किसान यूनियनने सांगितलं की, त्यांचे कुटुंब, मुले आणि नातू आंदोलनात सेवा बजावत आहेत. सूसाईट नोट सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. नोटमध्ये शेतकऱ्याने म्हटलंय की, आम्ही कधीपर्यंत येथे थंडीत बसून राहणार आहोत. सरकार काही ऐकत नाही, त्यामुळे मी आपला जीव देत आहे. जेणेकरुन सरकार यावर काही तोडगा काढेल. गाजियाबाद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  

मुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री धनवान; नितिश कुमारांनी जाहीर केली संपत्ती

दरम्यान, 30 डिसेंबरला केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेची सहावी फेरी पार पडली. बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी 4 विषय चर्चेसाठी पुढे ठेवले होते, त्यातील 2 मुद्यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली होती. सरकार शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा 4 जानेवारीला चर्चा करणार आहे. या दिवशी काही तोडगा निघण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Protest Farm Laws one more farmer suicide in delhi border

टॉपिकस
Topic Tags: