Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? हरियाणा पोलिसांनी दिली महत्वाची अपडेट

Farmers Protest Latest News : वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे, या चलो दिल्ली आंदोलनादरम्यान वेगवेगळ्या अफवा देखील पसरताना पाहायला मिळत आहेत
Farmers Protest File Photo
Farmers Protest File Photo

Haryana Police On Farmers Protest : वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे, या चलो दिल्ली आंदोलनादरम्यान वेगवेगळ्या अफवा देखील पसरताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान शेतकरी आंदोलनादरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्येचे वृत्त समोर आलं होतं. दरम्यान आता हरियाणा पोलिसांनी ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

हरियाणा पोलिसांनी आज दुपारी तीन वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आज शेतकरी आंदोलनात कोणत्याही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. ही फक्त एक अफावा आहे. दाता सिंह खनोरी बॉर्डरवर दोन पोलीस कर्मचारी आणि एक आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Farmers Protest File Photo
Rajiv Jain On LIC Shares : संधी हुकली...! अदानींना संकटातून बाहेर काढणाऱ्या राजीव जैन यांनी LIC बद्दल व्यक्त केली 'ही' खंत

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी वृत्तसेवा एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही पुढे गेलो असता, सरकारने आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिलं. सरकार आमच्याविरोधात प्रचार करत आहे. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा दावा केला की २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीला नंतर जाऊ, पहिल्यांदा त्या मुलाप्रती आपली जबाबदारी आहे, जो शहीद झाला आहे.

Farmers Protest File Photo
ICC Test Rankings : सर्फराज खानने पदार्पणासह ICC कसोटी क्रमवारीत मारली एन्ट्री! दिग्गजांना टाकले मागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com