Who is Shubhkaran Singh: खनौरी सीमेवर कसा झाला 22 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू? कोण होते शुभकरन सिंग? जाणून घ्या

Farmers Protest: खनौरी सीमेवर काल (बुधवारी) झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात २२ वर्षीय आंदोलक शुभकरण सिंग यांचा मृत्यू झाला. शुभकरणच्या पोस्टमार्टमनंतर एफआयआर नोंदवण्यात येईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.
Who is Shubhkaran Singh
Who is Shubhkaran Singh Esakal

Farmers Protest: खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचारी आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत बुधवारी भटिंडा येथील २२ वर्षीय शेतकरी शुभकरण सिंग ठार झाला. चकमकीत १२ पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. शुभकरणच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन तपासणीनंतर स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलं आहे.(Farmers protest Who was Shubhkaran Singh How did he die during Khanauri protest)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभकरण सिंग यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. त्याला मृत अवस्थेत आणण्यात आले आणि प्राथमिक तपासणीत त्याला गोळी लागल्याचे दिसून आले. शवविच्छेदनानंतरच आम्ही गोळीचे स्वरूप शोधू शकू, असंही वैद्यकीय आधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सीमेवरील शेतकऱ्यांनी सांगितले की, पोलीस अश्रुधुराच्या गोळ्यांसह रबराच्या गोळ्या झाडतात. तर हरियाणा पोलिसांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड आणि काठ्यांनी हल्ला केला.

आप नेते आणि पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह यांनी पोलिसांच्या कारवाईला लोकशाहीची हत्या म्हटले आहे.

पोलिसांच्या गोळीबारात सिंग यांचा मृत्यू झाल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केला. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या कारणाला दुजोरा मिळालेला नाही.

शुभकरणच्या पोस्टमार्टमनंतर एफआयआर नोंदवण्यात येईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.

एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी गेल्या ९ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान, हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा दावा आहे की, खनौरी सीमेवर बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका २२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर शेतकरी संतापले आहेत.

शुभकरणच्या पोस्टमार्टमनंतर एफआयआर नोंदवण्यात येईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. शुभकरणच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हरियाणा पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Who is Shubhkaran Singh
Farmer Protest: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ऊसाच्या FRP मध्ये वाढ

शुभकरण सिंग यांनी स्वत: तयार केला नाश्ता

२ वर्षांपूर्वी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना शुभकरण सिंग शेतकरी संघटनेत सहभागी झाला होता. भारतीय किसान एकता सिद्धपूर युनियनचे शुभकरण सिंग शेतकऱ्यांसोबत दिल्लीच्या दिशेने कूच करत असताना १३ फेब्रुवारीला खनौरी सीमेवर पोहोचला.

शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शुभकरण सिंग यानी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बुधवारी आंदोलनस्थळी स्वत: नाश्ता तयार केला. शेतकऱ्यांनी सांगितले की, शुभकरण सिंग यानी त्याच्या सहकाऱ्यांनाही एकत्र जेवण करायला सांगितले होते.

Who is Shubhkaran Singh
Farmers protest Delhi: तरुण आंदोलकाच्या मृत्यूनंतर ‘दिल्ली चलो’ मोर्चा शुक्रवारपर्यंत स्थगित; शेतकरी नेते पंढेर यांची माहिती

कोण होता शुभकरण सिंग? Who is Shubhkaran Singh

शुभकरण सिंग हा जवळपास २२ वर्षांचा होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता, ज्याचे वडील चरणजीत सिंग हे स्कूल व्हॅन चालक आहेत. तर त्याच्या आईचा आधीच मृत्यू झालेला आहे. शुभकरण सिंग याची स्वतःची ३.५ एकर जमीन आहे. याशिवाय त्यांनी काही प्राणीही पाळले होते. शुभकरण यांच्या पश्चात वडील, आजी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. एका मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या लहान बहिणीच्या लग्नाची जबाबदारी शुभकरणवर होती.

काँग्रेसने शुभकरणच्या मृत्यूसाठी भाजप सरकारला जबाबदार धरले आहे.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवर लिहिले की, खनौरी सीमेवर गोळीबारामुळे भटिंडा येथील तरुण शेतकरी शुभकरण सिंह यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. मोदी सरकारने आतापर्यंत ७५० शेतकऱ्यांचा जीव घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Who is Shubhkaran Singh
Indian Army Video: भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी वाचवले 500 जणांचे प्राण; थरारक व्हिडिओ समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com