Farmers Tractor March : शेतकऱ्यांचे इरादे बुलंद; चर्चेपूर्वी केली मोठी घोषणा

सकाळ ऑनलाईन
Sunday, 27 December 2020

कायदा मागे घेतला नाही तर आंदोलन सुरुच ठेवण्याचा इरादा शेतकऱ्यांचा दिसतोय.
29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता शेतकरी नेते सरकारसोबत चर्चा करणार आहेत.

Farmers Tractor March : मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला महिना उलटला आहे. आंदोलनाचा मार्ग सोडून सरकारने दिलेल्या प्रस्तावावर शेतकरी नेत्यांनी आता सकारात्मकदा दर्शवली आहे.

सरकारसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन कायम राहणार की काही तोडगा निघणार यासाठी 29 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एका बाजूला सरकारशी चर्चा करण्याची तयारी सुरु असताना शेतकऱ्यांनी 30 डिसेंबरला ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारसोबत चर्चेसाठी तयार झालेला शेतकरी कृषी कायदा रद्द करण्याच्या आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम असल्याचेच यावरुन दिसून येते. जर सरकारने

कायदा मागे घेतला नाही तर आंदोलन सुरुच ठेवण्याचा इरादा शेतकऱ्यांचा दिसतोय.
29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता शेतकरी नेते सरकारसोबत चर्चा करणार आहेत. शेतकरी नेत्यांनी यासंदर्भातील प्रस्तावही सरकारला पाठवला असून ते कृषी कायदा मागे घेण्यावर ठाम आहेत. क्रांतिकारी किसान यूनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी 30 डिसेंबरला सिंघू बॉर्डरलक ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. हा मार्च सिंघू ते टिकरी मार्गे  शाहजहां बॉर्डरवर काढण्यात येणार आहे. 

CBSE Board Exams : 31 डिसेंबरला होणार दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा

किर्ती किसान यूनियनचे नेते राजेंद्र सिंह म्हणाले की,  29 डिसेंबर रोजी कृषी कायदा मागे घेण्यासंदर्भात निर्णय झाला नाही तर 30 डिसेंबरला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. नव्याने लागू करण्यात आलेले तिन्ही कायदे रद्द करणे,  MSP कायदेशीर चौकट या गोष्टी सरकारने मान्य केल्या नाही तर 1 जानेवारीपर्यंत आंदोलनासाठीचा प्लॅन तयार आहे, असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे..   
सरकारसोबतच्या चर्चेत कोणते प्रमुख मुद्दे असतील? 

1. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायदे रद्द करण्याची प्रक्रिया काय असेल, यावर शेतकरी नेते चर्चा करु शकतात. 
2. MSP (शेती मालाला हमी भाव) देणाऱ्या कायद्याची तरतूद  
3.  राजधानीच्या परिसरातील वायू प्रदुषणाच्या मुद्यासंदर्भातही शेतकरी सरकारसोबत चर्चा करु शकतात. 
4. शेतकऱ्यांचे हितासाठी 'विद्युत संशोधन विधेयक 2020' मध्ये बदल करण्याची मागणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers ready to resume talks with govt but announced tractor march on 30th dec