''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Farooq Abdullah's Pakistan Remark Sparks Row : ‘पाकिस्तानच आपलं संरक्षण करत आहे, अन्यथा दिल्लीचे इरादे चांगले नाहीत,’ असं विधान त्यांनी बारामुल्ला येथील सभेत केलं.
Farooq Abdullah's

Farooq Abdullah's

esakal

Updated on: 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडत असल्याचं सांगत त्यांनी भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पाकिस्तानच आपलं संरक्षण करत आहे, अन्यथा दिल्लीचे इरादे चांगले नाहीत,’ असं विधान त्यांनी बारामुल्ला येथील सभेत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून, अब्दुल्ला यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com