esakal | कलम 370 परत आणल्याशिवाय मी मरणार नाही- फारुख अब्दुल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Farooq Abdullah main.jpg

मी भाजपला घाबरत नाही. भाजपला जर आपले शौर्य दाखवयाचे असेत तर त्यांनी सीमेवर जाऊन दाखवावं, इथे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

कलम 370 परत आणल्याशिवाय मी मरणार नाही- फारुख अब्दुल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये गुपकार आघाडीच्या बैठकीवरुन राजकारणाला वेग आला आहे. मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला आल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला हेही जम्मूत आले आहेत. याचदरम्यान या दोघांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आम्हाला पाकिस्तानी म्हटले जात आहे. आम्हाला तसं हवं असतं तर आम्ही 1947 मध्येच पाकिस्तानबरोबर गेलो असतो. आम्ही महात्मा गांधींच्या भारताला स्वतःला जोडले आहे, भाजपच्या भारताला नाही, अशी टीका फारुख अब्दुल्ला यांनी केली. 

जर त्यांना मला ठार मारायचं असेल तर जरुर मारावे. जगणं आणि मरणं हे ईश्वराच्या हातात आहे. माझं वय जरी 80 असले तरीही मी अजून तरुण आहे आणि जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय मी मरणार नाही. मी भाजपला घाबरत नाही. भाजपला जर आपले शौर्य दाखवयाचे असेत तर त्यांनी सीमेवर जाऊन दाखवावं, इथे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा- अमित शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण

भाजपने मतांसाठी काश्मिरी पंडितांचा वापर केला असल्याचा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला. ट्रम्प यांच्याप्रमाणे भाजपचे सरकारही जाईल. भाजप आणखी किती खोटं बोलणार, असा टोला लगावत आमची लढाई एका विचारधारेविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा- नितीशकुमार यांचा योगाभ्यास तर तेजस्वी यांचा ‘मूड ऑफ’

दरम्यान, उमर अब्दुल्ला यांनीही भाजपवर निशाणा साधला. 44 हून अधिक जागा मिळवण्याचे मिशन पूर्ण न झाल्याचा भाजप काश्मीरच्या जनतेचा बदला घेत आहे. मागील एक वर्षात सरकारने काय केले आहे ? राज्यात मागील एक वर्षात किती कारखाने सुरु झाले, हा प्रश्न मी राज्यपालांना विचारतो, असा सवाल त्यांनी केला.