श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात आज मोर्चा काढणाऱ्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बहीण आणि मुलगी यांच्यासह सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरैया आणि त्यांची मुलगी सफिया यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
पाच ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यातून कलम ३७० वगळल्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह शेकडो नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
या नेत्यांना सोडण्याची मागणी केली जात आहे. आज सकाळी महिलांच्या गटाने हाताला काळ्या फिती बांधून आणि फलके झळकवत मोर्चा सुरू केला. मात्र, सीआरपीएफच्या महिला जवानांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच माध्यमांना निवेदन वाटप करण्यासही मज्जाव केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.