
FasTag Annual Pass: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने टोलबाबत मोठं पाऊल उचललं असून १५ ऑगस्टपासून ३ हजार रुपयांच्या किंमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जाणार आहे. हा पास दिल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा २०० प्रवास वैध राहील. हा पास फक्त बिगरव्यावसायिक वाहनांसाठी असणार आहे.