esakal | सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena reaction on rahul gandhi savarkar statement Photo Source : NDTV.com

आज, दिल्लीत रामलिला मैदानावर काँग्रेसने भारत बचाव रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी राहुल यांनी  रेप इन इंडिया या वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे सांगताना, 'माझं नाव राहुल सावकर नाही', असं वक्तव्य राहुल यांनी केलं.

सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया या वक्तव्यावरून ऐन थंडीच्या दिवसांत दिल्लीतलं वातावरण तापलंय. राहुल यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत आणि राज्यसभेत गदारोळ झाला. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. पण, आज रामलिला मैदानावर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट करताना, 'माझं नाव राहुल सावकर नाही', असं वक्तव्य केलंय. यावरून महाराष्ट्रात हातमिळवणी करून सत्तेत आलेल्या काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. शिवसेनेनं, सावरकरांचा अपमान करू नका, असा इशारा राहुल गांधी आणि काँग्रेसला दिलाय.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

आणखी वाचा - माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी 

काय म्हणाले राहुल गांधी?
दिल्लीत सध्या राहुल गांधींनी माफी मागावी, अशी सत्ताधारी भाजपची मागणी चर्चेत आहे. झारखंडमधील सभेत राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या संख्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी 'मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आणि देशाला रेप इन इंडिया केले', अशा आशयाची घोषणा केली होती. त्यावर संसदेत भाजपने राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. पण, राहुल यांनी आपण वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. आज, दिल्लीत रामलिला मैदानावर काँग्रेसने भारत बचाव रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी राहुल यांनी  रेप इन इंडिया या वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे सांगताना, 'माझं नाव राहुल सावकर नाही', असं वक्तव्य राहुल यांनी केलं. त्यावरून भाजप-शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांना राहुल यांना लक्ष्य करण्यात आलंय.


शिवसेनेचं प्रत्युत्तर!
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेकडून लगेचच प्रतिक्रिया आली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची बोलणी करणारे खासदार संजय राऊत यांनीच ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटलंय की, आम्ही पंडित नेहरू आणि महात्मा गांधींचा सन्मान करतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नये. शहाण्या माणसाला आणखी काही सांगण्याची गरज नाही. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर, संपूर्ण देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधीयांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत.

loading image