तब्बल २७ वर्षांनंतर सोडले व्रत!

पीटीआय
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटावा म्हणून मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ८१ वर्षांच्या ऊर्मिला चतुर्वेदी या निवृत्त शिक्षिकेने मागील २७ वर्षांपासून एक व्रत अंगीकारले होते. इतर कशाचेही सेवन न करता फक्त फळे आणि दूध असा आहार त्या घेत होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी निकाल दिल्यामुळे समाधान व्यक्त करत १९९२ पासून सुरू केलेले उपवासाचे व्रत सोडणार असल्याचे ऊर्मिला यांनी सांगितले.

जबलपूर - अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटावा म्हणून मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ८१ वर्षांच्या ऊर्मिला चतुर्वेदी या निवृत्त शिक्षिकेने मागील २७ वर्षांपासून एक व्रत अंगीकारले होते. इतर कशाचेही सेवन न करता फक्त फळे आणि दूध असा आहार त्या घेत होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी निकाल दिल्यामुळे समाधान व्यक्त करत १९९२ पासून सुरू केलेले उपवासाचे व्रत सोडणार असल्याचे ऊर्मिला यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ऊर्मिला यांनी समाधान व्यक्त केले. राममंदिराचा मार्ग मोकळा करणारा निर्णय देतानाच मशिदीसाठीही पाच एकर जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे, त्यामुळे आपल्याला आनंद झाला असून, २७ वर्षांपासून अंगीकारलेले उपवासाचे व्रत सोडून यापुढे सामान्य आहाराचे सेवन करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे ऊर्मिला यांनी म्हटले आहे. त्यासाठी लवकरच उद्यापनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी महिती त्यांचे पुत्र अमित यांनी पीटीआयशी बोलताना दिली. 

अशा प्रकारचा निर्णय दिल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना अभिनंदन करणारे पत्र पाठविण्याची सूचनाही ऊर्मिला यांनी कुटुंबीयांना केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fasting release after 27 years ayodhya result