सिंधू नदीवर जलदगतीने सिंचन प्रकल्पांची योजना

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार जम्मू-काश्‍मीरमधील सुमारे 2.05 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोऱ्यात चार सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे. 

सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर आठवडाभरातच ही योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत 56 वर्षे जुन्या सिंधू पाणी कराराचा आढावा घेतला होता. रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

चार सिंचन प्रकल्पांपैकी पुलवामातील त्राल सिंचन प्रकल्प, कारगिलमधील प्रकाचिक खोज कालवा; तसेच जम्मूच्या सांबा व कथुआतील मुख्य रावी कालव्याचे नुतनीकरण व आधुनिकीकरण हे तीन प्रकल्प या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. राजपोरा उपसा सिंचन हा चौथा प्रकल्प डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. या सर्व कामासाठी 117 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा निधी कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बॅंकेमार्फत उभारला जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fastrack irrigation project on sindhu river