

महाकुंभ मेळ्यात निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर असलेले व्यासानंद गिरी हे वयाच्या १५ व्या वर्षी अध्यात्मिक मार्गावर वळले. महाकुंभ मेळ्यात त्यांचा एका भव्य सोहळ्यात पट्टाभिषेक पार पडला. वयाच्या १५ व्या वर्षांपासून व्यासानंद गिरी यांनी आदी शंकराचार्यांच्या सिद्धांताचे पालन करायला सुरुवात केली होती. योग ध्यान आणि संस्कृतचे ते प्रचारक आहेत. त्यांनी महर्षी महेश योगी यांच्या सानिध्यात आल्यानंतर घर सोडलं आणि संन्यास घेतला. दरम्यान, त्यांनी बड्या कंपन्यामध्ये कामही केलं.