

Sonipat Double Murder Revenge Killing Father and Son Shot Dead After Car Attack
Esakal
सोनीपतमध्ये राष्ट्रीय महामार्गावर बाप-लेकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळ्या झाडण्याआधी हल्लेखोरांनी दुचाकीला स्कॉर्पिओने धडक देत उडवलं. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या दोघांवर १५ गोळ्या झाडण्यात आल्या. यात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी नितीन सैनी हत्याकांडात दोघेही आरोपी होते. त्याचा बदला घेण्यासाठी दोघांची हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांच्या पाच पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.