

Father Sells Daughter For Money
ESakal
समाजात वडिलांना आपल्या मुलांचा रक्षक मानले जाते. मात्र कर्नाटकातील चिक्कमंगळुरु जिल्ह्यातील बिरूर येथे मानवतेला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. पैशाच्या लोभापायी एका वडिलांनी आपल्याच अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले. या घृणास्पद गुन्ह्यात मुलीची आजी देखील सहभागी होती. पोलिसांनी आतापर्यंत वडील आणि आजीसह १२ आरोपींना अटक केली आहे.