
सुन आणि तिच्या मैत्रिणीच्या दारू पार्ट्या, गोंधळ याला त्रासलेल्या सासऱ्यानं छापा टाकण्यासाठी पोलिसांनाच माहिती दिली. पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा हॉटेलमध्ये चार तरुण आणि दोन महिला होत्या. सहा जणांना अटक केली असून आरोपींवर दारूबंदी असलेल्या राज्यात दारू प्यायल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. गुजरातच्या सुरतमध्ये ही घटना घडलीय.