UPSC: वडील शेतकरी, 10 वर्षांपासून तयारी...यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर संपवलं जीवन!

UPSC result : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे.
crime news
crime news

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी लागला आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या यशाचे किस्से चवीने सांगितले जात आहेत. पण, ज्या हजारो, लाखो उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश येते त्यांच्याकडे दुर्लक्षच होते आहे. त्यातच दिल्लीच्या मुखर्जीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मुखर्जीनगरमध्ये २९ वर्षीय विद्यार्थीनी गेल्या १० वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला उत्तर प्रदेशच्या मेरठची रहिवाशी आहे. ती एका गरीब कुटुंबातून येते. तिचे वडील शेती करतात. (Father is a farmer,10 years of preparation Daughter ends life after UPSC result)

crime news
Crime: सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन काढल्याचा आला राग; दाम्पत्यावर केला जीवघेणा हल्ला

मंगळवारी दुपारी महिलेने पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आपलं जीवन संपवलं. माहितीनुसार, यावेळी तिच्या सोबत दुसरी एक मुलगी देखील होती. मैत्रीनीने तात्काळ पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मुलगी गेल्या काही महिन्यांपासून पीजीमध्ये राहात होती. ती एक यूट्यूब चॅनेल देखील चालवायची. काही व्हिडिओ, रिल्स ती याठिकाणी पोस्ट करायची. पोलिसांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळवली आहे. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. पीजीमधील इतर मुलींची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी तपासाआधी कोणत्याही निष्कर्षावर जाण्यास नकार दिला आहे.

crime news
Mumbai Crime News: टेम्पोमधून प्रवास करतांना तीन बांगलादेशी नागरीकांना अटक

यूपीएससीचा निकाल लागला

केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. आयएएस, आयपीएस, आयएफएस पदांसाठी ही भरती झाली आहे. जवळपास १८० मुलांना आयएएस आणि २०० मुलांना आयपीएस पोस्ट मिळण्याची शक्यता आहे. यूपीएससीमध्ये प्रथम आलेले आदित्य श्रीवास्तव हे सध्या आयपीएस म्हणून निवडले गेलेले उमेदवार आहेत. त्यांची संध्या ट्रेनिंग सुरु होती. त्यांना आयएएस होण्याची इच्छा होती. (UPSC)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com