
Honor Killing Father Films Himself Killing Daughter Over Love Doubt
Esakal
मुलीचे प्रेमसबंध असल्याच्या संशयावरून वडिलांनी तिचे हात बांधून कालव्यात फेकून दिल्याची घटना पंजाबच्या फिरोजपूरमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी याचा व्हिडीओसुद्धा बनवलाय. यावेळी मुलीची आई आणि लहान भाऊसुद्धा घटनास्थळी होते. मुलीला कालव्यात ढकलल्यानंतर आई मदतीसाठी ओरडत होती पण बाप मरुदे, चल म्हणत आईला तिथून घेऊन गेला. या प्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी केली जात आहे.