esakal | कोरोनाच्या धास्तीनं तिघींनी केलं स्वतःला १५ महिने आयसोलेट!
sakal

बोलून बातमी शोधा

Andhra women

कोरोनाच्या धास्तीनं तिघींनी केलं स्वतःला १५ महिने आयसोलेट!

sakal_logo
By
अमित उजागरे

हैदराबाद : लोकांनी कोरोना संसर्गाचा धसका घेतलेली अनेक उदाहरण आपण ऐकली आहेत. पण कोरोनाच्या भीतीचं एक भयानक उदाहरण आंध्र प्रदेशात दिसून आलं आहे. इथं एकाच कुटुंबातील तीन महिलांनी स्वतःला तब्बल १५ महिने आयसोलेट करुन घेतलं. आयसोलेशन नंतर जेव्हा या तिघी बाहेर आल्या तेव्हा त्या कुपोषित तसेच नैराश्यग्रस्त झाल्याचे दिसून आले. गोदावरी जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. 'द प्रिंट'नं याबाबत वृत्त दिलं आहे. (feare of Corona three women Andhra Pradesh isolate themselves 15 months aau85)

खरंतर झोपडीवजा घरात राहणाऱ्या या कुटुंबातील दोन पुरुष आणि तीन महिला अशा सर्वांनी कोरोनाच्या भीतीमुळं स्वतःला आयसोलेट करुन घेतलं होतं. पण यातील दोघे पुरुष काही वेळा कामानिमित्त आपल्या झोपडीबाहेर पडत होते. पण तीन महिलांनी मात्र स्वतःला एक वर्षाहून अधिक काळ पूर्णपणे कोंडून घेतलं होतं. इतक्या मोठ्या काळासाठी या महिलांनी स्वतःला बंदिस्त करुन घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार? या तिघीही कुपोषणाच्या शिकार झाल्या. सोमवारी घराबाहेर आल्यानंतर या महिलांना येथील राझोल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

हेही वाचा: 'सीए'चा निकाल बुधवारी होणार जाहीर

हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. प्रभाकर राव यांनी सांगितलं की, "या तिन्ही महिलांमध्ये जीवनसत्वांची कमतरता आहे. पुरेसा सूर्यप्रकाश शरिराला मिळाला नसल्याने 'ड' जीवनसत्व आणि 'बी' कॉम्प्लेक्स त्यांच्यात कमी झालं आहे. त्यांच्या शरिरातील हिमोग्लोबिनची मात्रा केवळ ४ ग्रॅम प्रति डेसिलीटर इतकीच आढळून आली आहे. जी सामान्य महिलेमध्ये १२.३ ते १५.३ ग्रॅम प्रति डेसिलीटर असणं अपेक्षित आहे."

हेही वाचा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू नाही - केंद्र सरकार

दरम्यान, या गावचे सरपंच चोप्पाला गुननाध म्हणाले, "गेल्यावर्षी मार्च महिन्यांत या कुटुंबाच्या शेजारील एका महिलेचा कोरोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या तीन महिला आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाहीत. त्या कुणालाही भेटल्या नाहीत. घराबाहेर कोणाशी भेट झाली तर आपल्यावर मृत्यूची वेळ येईल याच भीतीत त्या आत्तापर्यंत राहिल्या."

घटना कधी झाली उघड

या महिलांनी स्वतःला आयसोलेट केल्याची घटना तेव्हा उघड झाली जेव्हा गावातील एक व्यक्ती या कुटुंबाला भेटायला आला सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेण्यास सांगण्यासाठी तो गेला होता. मात्र, या कुटुंबानं त्या व्यक्तीला भेटण्यास नकार दिला. कारण, जर हे लोक घराबाहेर आले तर त्यांचा मृत्यू होईल असं त्यांनी या व्यक्तीला सांगितलं, अशी माहिती सरपंचांनी दिली.

loading image