Delhi Crime : दिल्लीत गुन्हेगारीचा कहर! दिवसाढवळ्या वकिलाची गोळ्या झाडून हत्या

Delhi Crime
Delhi Crimeesakal

नवी दिल्ली : दिल्लीत एका वकिलाची सार्वजनिकस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण द्वारका भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Delhi Crime
Pakistan : पाकिस्तानात अन्नधान्य वितरण केंद्रावर चेंगराचेंगरी, १२ नागरिक ठार

जखमीला नंतर जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत वकिलाचे नाव वीरेंद्र असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आतापर्यंतच्या तपासानुसार हे संपूर्ण प्रकरण परस्पर वैमनस्यातून असल्याचे दिसते. मात्र, पोलिस या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

या घटनेचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणाच्या तपासात आरोपी दुचाकीवरून आल्याचे निष्पन्न झाले आहे. वीरेंद्रवर गोळीबार झाला तेव्हा ते त्यांच्या गाडीत होते. आरोपींनी वीरेंद्रवर अनेक राऊंड गोळीबार केला.

Delhi Crime
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याविरोधात आणखी एक अब्रुनुकसानीचा खटला; RSSला म्हटले होते...

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. जेणेकरून ते आरोपींना ओळखू शकतील. यासोबतच पोलीस घटनास्थळाजवळ राहणाऱ्या काही लोकांचीही चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com