शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दाखविले अश्लिल व्हिडिओ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

राजकोट (गुजरात) - पोरबंदर येथील सरकारी शाळेतील एका पन्नास वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

राजकोट (गुजरात) - पोरबंदर येथील सरकारी शाळेतील एका पन्नास वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एका शिक्षिकेने आपल्या मोबाईलवरील अश्लिल छायाचित्रे व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवत होती व नग्न होऊन नृत्य करण्यास भाग पाडत होती. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. नग्न होण्यास नकार देण्याऱया विद्यार्थ्यांना ती वर्गाबाहेर काढत होती. याबाबतची तक्रार काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे केली होती.

दोन डझनहून अधिक पालक गुरुवारी (ता. 23) शाळेत आले होते. शाळेच्या प्रशासनाकडे याबाबतचा खुलासा मागितला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Female teacher booked for showing obscene clips to kids