
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लशीचे वितरण सुरू झाले. ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या या लशींची पहिली खेप १३ शहरांमध्ये पाठविण्यात आली. दिल्लीसह काही राज्यांना लस मिळाली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला देशभरात शनिवार (ता.१६)पासून सुरुवात होणार असली तरी आजपासून लस विविध राज्यांत पोचली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लशीचे वितरण सुरू झाले. ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या या लशींची पहिली खेप १३ शहरांमध्ये पाठविण्यात आली. दिल्लीसह काही राज्यांना लस मिळाली आहे.
वितरण व्यवस्था
एअर इंडिया, स्पाइसजेट, गोएअर, इंडिगो या कंपन्यांच्या विमानांतून देशातील १३ ठिकाणी.
अहमदाबाद, कोलकता, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनौ, चंडीगड, पाटणा आणि भुवनेश्वरला रवाना.
पुण्याहून नऊ विमानांतून कोव्हिशिल्डचे ५६.५ लाख डोस पाठविण्यात आले, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांची माहिती.
नवी दिल्ली
राजधानीत सर्वांत आधी कोव्हिशिल्डची पहिली खेप सकाळी पोचली.
सीरमच्या उत्पादन केंद्रातून लशींनी भरलेले तीन ट्रक पुणे विमानतळावर पोचले.
स्पाईसजेटच्या विमानाने लस दिल्लीत.
पहिल्या खेपेत लशींच्या ३४ पेट्या होत्या. त्यांचे वजन १०८८ किलोग्रॅम होते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लशींची वाहतूक
उत्तर प्रदेश
दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी लशींसह पुण्यातून इंडिगोच्या विमानाचे लखनौला उड्डाण.
पहिल्या टप्प्यात ६० हजार डोस.
विमानतळावरुन कडक सुरक्षा व्यवस्थेत लस ऐशबागला रवाना.
लशींच्या सुरक्षेसाठी ऐशबाग येथे ‘आइस लाइन रेफ्रिजरेटर (आयएलआर)ची व्यवस्था.
‘आयएलआर’मुळे लस थंड वातावरणात ठेवणे शक्य.
सुमारे दहा लाख रुपये खर्च करून हे शीतगृह तयार केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कर्नाटक
बंगळूर व बेळगाव विमानतळावर लशींचे ६.४७ लाख डोस पोचले.
लसीकरण मोहिमेत पारदर्शकता ठेवण्यासाठी समिती स्थापन.
उर्वरित डोस बुधवारी (ता.१३) पोचणार असल्याची आरोग्यमंत्री के. सुधाकर यांची माहिती.
पहिल्या टप्प्यात २३५ केंद्रांवर १६ लाख कोरोनायोद्ध्यांना लस देणार.
तमिळनाडू
कोव्हिशिल्डची पहिली खेप आज सकाळी साडेदहा वाजता पोचली.
पुण्याहून विशेष विमानाने ५.३६ लाख डोसांचे वितरण.
राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांच्या सांगण्यानुसार अजून २० हजार डोसांची प्रतीक्षा.
मुख्यमंत्री के. पलानीस्वामी
यांच्या हस्ते होणार लसीकरणाला सुरुवात.
राज्यात दोन हजार लसीकरण केंद्रे.
योग्य तापमानाला लस ठेवण्यासाठी ५१ गोदामे तयार.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बिहार
पुण्याहून पाटणा विमानतळावर लस पोचली.
पाटण्यातील रुग्णालये व नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात (एनएमसीएच) लस रवाना.
कोविन पोर्टलवर बिहारमधील ४.३० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी.
पहिल्या खेपेत लशींच्या ५४ हजार ९०० कुप्यांचा समावेश.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत शनिवारी लसीकरण.
राज्यात ३०० केंद्रे उभारली.
पश्चिम बंगाल
कोलकता येथे ५८ खोक्यांमधून कोविशिल्डच्या १०.५ लाख लशींचे डोस पोचले.
विमानतळावरून पोलिसांच्या सुरक्षेत तीन ट्रकमधून वाहतूक.
कोलकत्यातील बाघबजार येथे आरोग्य विभागाच्या मध्यवर्ती केंद्रात साठवणूक.
सात लाख कुप्या उत्तर बंगालला पाठविल्या.
उर्वरित कुप्या पुरुलियास बांकुरा आदि ठिकाणी रवाना.
९४१ कोरोना केंद्रांची उभारणी.
आणखी वाचा - आज दिवसभरात काय घडले? महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
आंध्र प्रदेश
विजयवाडा येथे लशींचे ४.९६ लाथ डोस पोचले.
राज्यात पहिल्या टप्प्यात ३.७ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार.
दररोज १०० आरोग्यसेवकांचे लसीकरण.
आठ महिन्यांच्या कालावधीत दहा कोटी डोस देणार.
लसीकरणासाठी एक हजार ९४० केंद्रे.
एक हजार ६५ केंद्रात शीतगृहाची सोय.
गुजरात
अहमदाबादला पहिल्या टप्प्यातील २.७६ लाख लशींचे डोस पोचले.
अहमदाबादसह गांधीनगर आणि भावनगर विभागात वितरण.
राज्यात शनिवारपासून २८७ केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ.
तेलंगण
लशींची पहिली खेप हैदराबादमधील गन्नवरम विमानतळावर पोचली.
राज्यात १३९ केंद्रात लसीकरण.
प्रत्येत जिल्ह्यात दोन किंवा तीन केंद्रे उभारणार.
नागरिकांना विश्वास देण्यासाठी आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र सर्वांत आधी लस टोचून घेणार
पहिल्या दिवशी १३ हजार ९०० डोस देणार.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील दोन लाख ९० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी.
आणखी वाचा - गुड न्यूज : देशात आणखी चार लसींवर काम सुरू
ओडिशा
कोव्हिशिल्डचे ३४ खोकी भुवनेश्वर विमानतळावर पोचले.
खोक्यांचे एकूण वजन बाराशे किलोग्रॅम.
जिल्हानिहाय लस वाटपासाठी खास वाहनाची सोय.
राज्यातीस एक हजार २२२ शीतगृहांत लशींची साठवणूक.
लसीकरणासाठी १६० केंद्रे.
पहिल्या टप्प्यात ३.३३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार.
पहिल्या दिवशी १६ हजार डोस देण्याचे उद्दिष्ट .
कोव्हिशिल्डचे ४.०८ लाख डोसांचे वितरण.
दुसऱ्या टप्प्यात पोलिस, निमलष्करी दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लस देणार.