राज्यघटनाविरोधी घटकांशी लढा: सोनिया गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

भारताच्या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या घटकांविरोधात प्रत्येक भारतीय नागरिकाने लढण्याची आवश्‍यकता आहे

नवी दिल्ली - भारताचे सामर्थ्य हे आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (गुरुवार) केले. "या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व नष्ट करणाऱ्या घटकांशी' लढण्याचे आवाहनही गांधी यांनी यावेळी केले.

"भारताचे खरे सामर्थ्य हे असमानता व अन्यायाविरोधातील संघर्ष आणि आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये सामावलेले आहे. या घटनात्मक मूल्यांच्या संरक्षण व संवर्धनाप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठीचा आजचा दिवस आहे. राज्यघटनेच्या निर्मिती करणाऱ्या थोर विचारवंतांसह, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक व भारतीय संघराज्याचे संस्थापकांना माझी आदरांजली... भारताच्या घटनात्मक मूल्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या घटकांविरोधात प्रत्येक भारतीय नागरिकाने लढण्याची आवश्‍यकता आहे,'' असे गांधी यांनी म्हटले आहे.

Web Title: Fight forces seeking to undermine constitutional values: Sonia