उत्तर प्रदेश सरकारची 'घर वापसी' मोहिम

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

काय आहे ही मोहिम?
जिहादी साहित्य, व्हिडिओ आदींद्वारे प्रभावित होऊन दहशतवादाच्या मार्गावर जात असलेल्या किंवा तशी मानसिकता तयार करत असलेल्या दिशाभूल व्यक्तींना समज देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ही 'घर वापसी' मोहिम आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश सरकारने जहालमतवादी विचारांच्या आहारी जाऊन दिशाभूल होत असलेल्या तरुणांच्या पालकांना माहिती देऊन अशा तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात  आणण्यासाठी 'घर वापसी' नावाची ही योजना उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) राबविण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना एटीएसचे महानिरीक्षक असिम अरुण म्हणाले, 'उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही ही योजना राबवित आहोत. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांच्या पाकलांना कळविण्यात येणार आहे. अशा तरुणांचे समुपदेशन करण्याबाबत पालकांना सांगण्यात येणार आहे.'

एखाद्या कुटुंबातील सदस्य दहशतवादाच्या मार्गावर जात असल्याचे इतर सदस्यांना आढळून येते. मात्र, अशा वेळी काय करावे हे त्यांना समजत नाही. अशा वेळी एटीएस त्यांची मदत करणार आहे. त्यासाठी मदत कक्षाचे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एटीएसने अलिकडेच चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही योजना राबविण्यात येत आहे.

काय आहे ही मोहिम?
जिहादी साहित्य, व्हिडिओ आदींद्वारे प्रभावित होऊन दहशतवादाच्या मार्गावर जात असलेल्या किंवा तशी मानसिकता तयार करत असलेल्या दिशाभूल व्यक्तींना समज देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ही 'घर वापसी' मोहिम आहे.

Web Title: To Fight Radicalisation, Adityanath Government Has A Plan: Ghar Wapsi