Video : केजरीवाल नकोच! राजकारणात येण्याआधीच पाहिले होते हुकूमशहाचे गुण; अनुरागने सांगितला किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Film maker Anurag Kashyap says Arvind Kejriwal is a dictator and worse than anyone

Arvind Kejriwal : केजरीवाल नकोच! राजकारणात येण्याआधीच पाहिले होते हुकूमशहाचे गुण; अनुरागने सांगितला किस्सा

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या राजकीय विधानांमुले तसेच त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बऱ्याचदा त्याच्या वक्तव्यमुळे वाद देखील होतात. आता अनुरागने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे हुकूमशाह असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर ते सर्वात वाईट ठरतील असे देखील म्हटले आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप याला राहुल गांधी की अरविंद केजरीवाल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी अनुरागने केजरीवार यांच्याबद्दलचा जुना किस्सा देखील सांगितला आहे.

अरवींद केजरीवाल तर नक्कीच नको. कारण केजरीवाल पुढे येण्याच्या आधीच मी ओळखलं होतं. केजरीवाल राजकारणात येण्याआधीची गोष्ट आहे, जेव्हा ते सामाजिक कार्य करत होते. एक आरटीआय कार्यकर्ता होता शेखर जो केजरीवाल यांच्यासोबत काम करत असे. ते एका कार्यक्रमात स्टेजवर बसलेले होते. तेव्हा केजरीवालांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना गर्दीने टाळ्या वाजवल्या. तेव्हा केजरीवाल यांनी गर्दीकडे हात दाखवला..

तेव्हा मला जाणवलं की ही व्यक्ती सगळं गर्दीसाठी बोलतेय आणि गर्दीसाठीच काम करेल. तेव्हा ते सामाजिक कार्यकर्ता होते. मला तेव्हा वाटलं होतं पुढं तसंच झालं आणि केजरीवाल राजकारणात दाखल झाले असे अनुराग म्हणाला.

अनुराग पुढे म्हणाला की, मी तेव्हाच म्हणालो होते तुम्ही या व्यक्तीला सत्ता द्या आणि तो वाईट बनत जाईल. तो माणूस पॉल पॉट या कंबोडीयाच्या हुकूमशाप्रमाणे आहे, ज्याला वाटतं राहतं की मला ठावूक आहे की लोकांसाठी काय योग्य आहे. त्याला असे वाटते की तो जे काही करत आहे ते सर्वांसाठी योग्य आहे आणि त्याला प्रत्येक व्यक्तीवर आपले विचार लादायचे आहेत . त्याला टीकाही सहन होत नाही. मला ते जास्त धोकादायक वाटतं. मला एक असा नेता सांगा जो टीका सहन करतो...

टॅग्स :Arvind KejriwalaapVideo