esakal | सुशांतसिंहवर बेतलेले चित्रपट होणार प्रदर्शित
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant Singh Rajput

सुशांतसिंहवर बेतलेले चित्रपट होणार प्रदर्शित

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - बॉलीवूडचा (Bollywood) दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या जीवनावर आधारित आणि भविष्यात (Future) रिलीज (Release) होणाऱ्या सर्वच चित्रपटांना स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) आज स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. (Film on Sushant Singh will be Screened)

सुशांतच्याच जीवनावर बेतलेला ‘न्याय - दि जस्टिस हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हे सगळे चित्रपट संबंधित अभिनेत्याचे आत्मवृत्त नसून त्या अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये नेमके काय घडले? याची नेमकेपणाने माहिती देखील त्यातून मिळत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ‘मरणोत्तर खासगीपणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही,’ असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भातील याचिका सुशांतसिंह यांच्या वडिलांनीच सादर केली होती.न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले, की ‘निर्माते आणि दिग्दर्शकांच्या बोलण्यामध्ये आम्हाला तथ्य जाणवते. एखाद्या घटनेची माहिती जगजाहीर असेल आणि त्यावर एखाद्या व्यक्तीने चित्रपट तयार केला तर तो खासगीपणाच्या अधिकाराचा भंग ठरत नाही.’ सुशांतच्या जीवनावर बेतलेल्या ‘सुसाईड ऑर मर्डर ः ए स्टार वॉज लॉस्ट’, शशांक हे चित्रपट प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा: ...तर संसदेतील शपथ खोटी होती का?; नुसरतला मालवीय यांचा सवाल

आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ विधीज्ञ विकास सिंह यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांची बाजू मांडली. एखाद्या घटनेच्या वार्तांकनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असते पण जेव्हा हाच मुद्दा व्यावसायिक पातळीवर येतो तेव्हा मात्र त्याला हे तत्त्व लागू होत नाही, असा दावा विकास सिंह यांनी केला होता पण न्यायालयाने तो फेटाळून लावला.

वडिलांची याचिका फेटाळली

न्या. संजीव नरूला यांच्या खंडपीठाने यासंदर्भात सुशांत याचे वडील कृष्णकिशोर सिंह यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोणत्याही दिग्दर्शकाने आपल्या मुलाच्या नावाचा किंवा त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा चित्रपटामध्ये वापर करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. सुशांतच्या वडिलांनी केलेले युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केले. या चित्रपटांच्या माध्यमातून नेमकी किती रुपयांची कमाई केली? याचा तपशील सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने निर्माते आणि दिग्दर्शकांना दिले आहेत. याच प्रकरणावरून भविष्यामध्ये एखादा आर्थिक नुकसानभरपाईचा खटला दाखल झाला तर त्यावेळी हा तपशील महत्त्वाचा ठरेन असे न्यायालयाने म्हटले आहे.