esakal | अखेर महिंद्रांना मिळाला अक्सर पटेलचा गॉगल; आज रात्री लुटणार सामन्याचा 'आनंद'
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra_Axar Patel

महिंद्रा यांनी स्वतः हे भन्नाट ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून अनेक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत.

अखेर महिंद्रांना मिळाला अक्सर पटेलचा गॉगल; आज रात्री लुटणार सामन्याचा 'आनंद'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) यांना अखेर क्रिकेटपटू अक्सर पटेलचा (Axar Patel) तो लकी गॉगल मिळाला असून आज रात्री हाच गॉगल लाऊन ते भारत विरुद्ध इंग्लंडचा टी-२०चा सामना टीव्हीवर पाहत आनंद घेणार आहेत. महिंद्रा यांनी स्वतः हे भन्नाट ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून अनेक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत.

आनंद महिंद्रा हे आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखले जातात. चालू घडामोडींवर ते अनेकदा आपल्या मिश्किल शौलीत भाष्य करत असतात. आजही त्यांनी अशाच प्रकारचं एक ट्विट केलं यामध्ये त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी केलेलं एक ट्विट शेअर केलं आहे. त्यावेळी भारतानं शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. या सामन्यात अक्सर पटेलने आपल्या डोळ्यांवर गॉगल लावून गोलंदाजी करतानाचा फोटो शेअर केला होता. तसेच मालिका जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले होते. त्याचबरोबर भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ अक्सर पटेलने वापरलेले सनग्लासेस आपल्यालाही मिळायला हवेत असं उपरोधिकपणे म्हटलं होतं. हा लकी गॉगलचा ब्रॅण्ड कुठला आहे आणि तो मला कुठे मिळू शकेल? असंही त्यांनी विचारलं होतं. 

'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना 'टीम इंडिया'त संधी; इंग्लंडच्या बोलर्सना चॅलेंज

दरम्यान, आजच्या ताज्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "मी म्हणालो होतो की मला भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ अक्सरने वापरलेला तो गॉगल हवा आहे. अखेर मला तो मिळाला आहे (यासाठी स्पोर्टिंग टूल रेलिशचे आभार) आणि आता हा गॉगल डोळ्यावर लावून मी आज रात्रीचा सामना पाहणार आहे. मला माहिती आहे की टीव्हीवर सामना पाहण्यासाठी गॉगल लावण्याची गरज नाही. माझ्या बायकोलाही वाटेल मी वेडा झालोय की काय? पण माझ्यासाठी हा गॉगल कदाचित गुडलक चार्म ठरु शकेल" विशेष म्हणजे ज्या अक्सर पटेलच्या या गॉगलचा त्यांनी उल्लेख केला आहे, त्याच अक्सरला या सामन्यात खेळणार विश्रांती देण्यात आली आहे. 

IND vs ENG: विराटनं पुन्हा चूक केली; दुसऱ्या मॅचमध्येही रोहित कट्ट्यावर

महिंद्रा यांनी केलेल्या या भन्नाट ट्विटवर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या असून एकानं त्यांना म्हटलं की, "हा गॉगल लावलेला एक फोटोही पोस्ट करा प्लीज" तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, "तुम्ही हा गॉगल अक्सरकडूनच विकत घ्यायला हवा कारण तो आज या सामन्यात खेळणार नाहीए" तर आणखी एक जण म्हणाला, "सर तुम्ही गॉगल लावून मॅच पाहणार आहात म्हणूनच अक्सर आज खेळत नाहीए" 
 

loading image