Nirmala Sitaraman : एका हातात देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या हातात भाजीपाला; अर्थमंत्री गेल्या मंडईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Niramala Sitharaman
Nirmala Sitaraman : एका हातात देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या हातात भाजीपाला; अर्थमंत्री गेल्या मंडईत

Nirmala Sitaraman : एका हातात देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या हातात भाजीपाला; अर्थमंत्री गेल्या मंडईत

माणूस कितीही मोठा झाला, कितीही मोठ्या पदावर गेला, तरी काही गोष्टी त्याला करणं भाग असतं. किंवा काही गोष्टी करण्याची त्याला आवड असते. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात, पण तो माणूस मोठा असल्यानं त्याची चर्चा होते. अशीच चर्चा सध्या सुरू आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची.

निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीतारामन स्वतः मंडईमध्ये भाजी घेताना दिसत आहेत. सीतारामन काल चेन्नई दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान, त्या मायलापोर भाजी मंडईजवळ थांबल्या. तिथल्या विक्रेत्यासोबत गप्पा मारल्या आणि भाजी तसंच काही किचनचं सामानही खरेदी केलं. सीतारामन यांच्या कार्यालयाकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

त्यांनी चेन्नईमध्ये काल विशेष मुलांसाठी आनंद करुणा विद्यालयाचं उद्घाटन केलं. ही विशेष मुलांसाठीची शाळा आहे. ऑटिजम, डिस्लेक्सिया असे मती आणि गती संदर्भातल्या आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी ही शाळा आहे. ज्यांना या आजारांवरचे उपचार परवडत नाहीत, त्यांच्यासाठी ही शाळा सुरू कऱण्यात आली आहे.