आधार क्रमांक चुकल्यास आता १० हजारांचा दंड

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

...तर होणार दंड 

  • पॅनच्या जागी चुकीचा आधार क्रमांक दिल्यास
  • मोठ्या रकमेच्या व्यवहारावेळी आधार किंवा पॅन न दिल्यास

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने करदात्यांच्या सुविधेसाठी पॅन क्रमांकाऐवजी १२ आकडी आधार क्रमांक देण्याची मुभा करदात्यांना दिली आहे. मात्र, आधार क्रमांक चुकल्यास करदात्यांना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. 

प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये सुधारणा करून वित्त विधेयक २०१९ मध्ये ती मांडण्यात आली आहे. यानुसार आधार क्रमांक देण्याची मुभा करदात्यांना आहे. यामध्ये चुकीचा आधार क्रमांक दिल्यास १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पॅन क्रमांकाऐवजी आधारचा क्रमांक दिल्यास हा नियम लागू होणार आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विवरणपत्र भरताना, बॅंक खाते उघडताना, डिमॅट खाते सुरू करताना, म्युच्युअल फंड किंवा रोखे खरेदीवेळी तसेच, ५० हजार रुपयांपेक्षा मोठा व्यवहार करताना पॅन क्रमांक देणे बंधनकारक असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fine of Rupees 10000 for aadhar card number wrong