Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे. राजकोट पोलीस आयुक्तांनी सांगितले की, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Rajkot TRP Game Zone Fire
Rajkot TRP Game Zone FireEsakal

गुजरातमधील राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. हा टीआरपी गेम झोन आगीच्या भक्ष्यस्थानी आला आणि काही मिनिटांतच तो 'डेथ झोन' बनला. काल (शनिवार) येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गेम झोन राखेचा ढीग झाला होता. अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. टीआरपी गेम झोन हा सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन होता. येथे 20 हून अधिक साहसी खेळ खेळले जात होते. या प्रकरणात आता कारवाईला वेग आला आहे.

राजकोट गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३०८, ३३७, ३३८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पथक काम करत आहे. पुरावे गोळा करण्यासाठी गांधीनगरचे एक एफएसएल पथकही घटनास्थळी आहे. उर्वरित चार आरोपींना अटक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Rajkot TRP Game Zone Fire
Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवीन खुलासे समोर येत आहेत. फायर लायसन्सशिवाय गेम झोन सुरू असून बाहेर पडण्यासाठी एकच गेट असल्याचे उघड झाले आहे. एकच गेट असल्याने अपघातानंतर अनेकांना बाहेर पडता आले नाही.

बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या राजकोटच्या महापौर नयना पेधाडिया यांनीही फायर एनओसी नसल्याचे सांगितले आहे. पेधाडिया यांनी सांगितले, "एवढा मोठा गेम झोन फायर एनओसीशिवाय कसा चालला याची आम्ही चौकशी करू. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या मुद्द्यावर कोणालाही राजकारण करू दिले जाणार नाही. येथून बाहेर पडण्यासाठी एकच इमर्जन्सी गेट आहे, त्यामुळे आग लागल्यानंतर गोंधळ उडाला."

Rajkot TRP Game Zone Fire
Rajkot Fire: गेमिंग झोनमधील आगीतील मृतदेहांची राख, ओळख पटवण्याचे आव्हान; मृतांचा आकडा 28 वर

राजकोटचे अग्निशमन अधिकारी इलेश खेर यांनी सांगितले की, प्रवेशद्वाराजवळील तात्पुरती इमारत कोसळल्याने लोक अडकले होते, त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते. आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना गुजरातमधील सर्व गेमिंग झोनची तपासणी करण्याचे आणि फायर एनओसीशिवाय चालणारे गेमिंग झोन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Rajkot TRP Game Zone Fire
Free Fire Game : गेम टास्क पूर्ण करण्याच्या नादात दिला जीव, फ्री फायरमुळे 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com