Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Asaduddin Owaisi: ओवेसी या मतदारसंघातून गेली पाच टर्म विजयी होत आहेत. त्यामुळे यंदा काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Madhavi Latha|Asaduddin Owaisi
Madhavi Latha|Asaduddin OwaisiEsakal

हैदराबाद पोलिसांनी नुकतेच हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार के. माधवी लता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रीया देताना माधवी लता म्हणाल्या, माझ्यावर दाखल झालेले गुन्हे मला मेडल्ससारखे आहेत.

माधवी लता यांनी काही बुरखा घातलेल्या मुस्लिम महिला मतदारांना त्यांची ओळख तपासण्यासाठी मतदान केंद्रावर बुरखा काढून त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगितले होते.

कट्टर हिंदुत्त्ववादी असणाऱ्या माधीवी लता यांनी हैदराबात लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

ओवेसी या मतदारसंघातून अनेक वर्षे झाले विजयी होत आहेत. त्यामुळे यंदा काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Madhavi Latha|Asaduddin Owaisi
Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

भाजप उमेदवार मुस्लिम महिलांची ओळखपत्रे तपासून त्यांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हैदराबादचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी, जे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी आहेत, यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

यानंतर माधवी लता म्हणाल्या "मला माहिती मिळाली की, पीठासीन अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीला मतदान करताना पकडले. पण गुन्हा दाखल केला नाही. ते माझ्यावर एफआयआर नोंदवायला मोकळे आहेत पण इतरांवर ते काहीही कारवाई करत नाहीत. माझ्यावरील गुन्हे 'राम बान'पासून सुरू झाले. माझ्यावर होत दाखल होत असलेले हे गुन्हे मेडल्ससारखे आहेत.”

Madhavi Latha|Asaduddin Owaisi
Swati Maliwal: "होय, स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाले, केजरीवाल कारवाई करतील," 'आप'ने स्वीकारले आरोप

निवडणुकीत अवाजवी प्रभाव पाडणे, सार्वजनिक कार्यात शासकीय कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण करणे, चिथावणी देण्याच्या उद्देशाने कृत्य करणे या कलमांन्वये माधवी लता यांच्याविरुद्ध मलकपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या निवडणुकीच्या काळात दोन्ही उमेदवारांनी प्रचारामध्ये एकमेकांवर सडकून टीका केली आहे. तसेच माधवी लता यांचा धार्मिक स्थळाकडे बाण मारण्याच्या हावभावामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com