मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 50 कलाकारांविरूद्ध तक्रार दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मॉब लिंचिंगप्रकरणी या कलाकारांनी मोदींना पत्र लिहिल्यानंतर मुझफ्फरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी देशात सर्रास होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या विरोधात 50 कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. आता या 50 कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मोठमोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. मॉब लिंचिंगप्रकरणी या कलाकारांनी मोदींना पत्र लिहिल्यानंतर मुझफ्फरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती.

बिग ब्रदर इज वॉचिंग...

याप्रकरणात अनुराग कश्यप, रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अपर्णा सेन अशा अनेक बड्या कलाकारांचा समावेश आहे. ओझा यांनी याचिका दाखल केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 20 ऑगस्टला हा आदेश देण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले. या तक्रारीत 50 कलाकारांचा समावेश होता. 

गुडन्यूज! मी बाबा झालो; रहाणेला कन्यारत्न

कलाकारांनी मोदींना लिहिलेल्या या पत्रातून देशाची प्रतिमा अपमानास्पद करण्याचा व पंतप्रधान मोदींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करण्यात आला. यात सार्वजनिक शांततेचा भंग, धार्मिक भावनांना धक्का, देशद्रोह या कलमांचा समावेश आहे. जुलैमध्ये 50 कलाकारंनी मोदींना मॉब लिंचिंगविरोधात पत्र लिहिले होते. मॉब लिंचिंग थांबावे यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत अशा आशयाचे हे पत्र होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against 50 celebrities who sends letter to PM Modi about Mob lynching