Ujjain Mahakaleshwar Temple FireESakal
देश
Mahakal Temple Fire: उज्जैनच्या बाबा महाकाल मंदिरात भीषण आग; १ किमी अंतरापर्यंत ज्वाळा, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
Ujjain Mahakaleshwar Temple Fire: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भयंकर रूप धारण केले. या घटनेमुळे संपूर्ण मंदिर परिसरात खळबळ उडाली.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बाबा महाकालेश्वर यांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. सोमवारी येथील मंदिर परिसरात भीषण आग लागली. आवारात असलेल्या नियंत्रण कक्षाच्या छतावर आग लागली. या अपघातात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एअर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमच्या बॅटरी जळाल्या. आगीच्या ज्वाळा १ किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या.

