जम्मूत भंगार दुकानाला आग; ४ जणांचा मृत्यू, १४ जखमी | Jammu And Kashmir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Broke Out In Scrap Shop In Jammu

जम्मूत भंगार दुकानाला आग; ४ जणांचा मृत्यू, १४ जखमी

श्रीनगर : जम्मू भागात आज सोमवारी (ता.१४) अचानक भंगार दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत १४ जण जखमी झाले आहेत. भंगार दुकानाच्या आत असलेल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट झालेला आहे. बचाव कार्य सुरु असल्याचे जम्मू (Jammu) विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. (Fire Broke Ourt In A Scrap Shop In Jammu, Four People Died)

हेही वाचा: निवडणुकीवरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सुनावले, म्हणाले...

भंगार दुकानाला आग कशामुळे लागली आहे. याचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

Web Title: Fire Broke Out In A Scrap Shop In Jammu Four People Died

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top