दिल्लीतील शहादरात आगीत तिघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

या आगीत जखमी झालेल्या दहा जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. 

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील शहादरा भागातील मोहन पार्क येथे आज (बुधवार) सकाळी लागलेल्या भीषण आगीत तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादरा भागातील एक लेनला शॉर्ट सर्कीटमुळे आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीचे नुकसान झाले असून, ईरिक्षासह काही गाड्या भस्मसात झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

या आगीत जखमी झालेल्या दहा जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. 

Web Title: Fire in Delhi's Shahdara kills three