फ्रान्सने गमावली प्राचीन वास्तू; 'नोट्रे-डेम कॅथेड्रल' पुन्हा उभे करण्याचे आव्हान

Fire devastates Notre Dame Cathedral in paris france centuries old Parisian landmark
Fire devastates Notre Dame Cathedral in paris france centuries old Parisian landmark

फ्रान्स : पॅरिसमधील जगप्रसिध्द नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्च आज आगीच्या आहारी गेले. या दुर्दैवी घटनेत पॅरिसने एक अत्यंत प्राचीन अशी ही वास्तू गमावली आहे. हे चर्च गॉथिक कॅथेड्रल या वास्तूरचनेचा अत्भुत नमुना मानला जातो. सीन नदीच्या काठावर आगीच्या भक्षस्थानी पडलेलं हे चर्च पुन्हा उभं करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. युनोस्को वर्ल्ड हेरिटेज असलेल्या या वास्तूला वर्षभरात जवळपास 1.2 लाख पर्यटक भेट देतात. 

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या चर्चला हार्ट ऑफ पॅरिस मानले जाते. बाराव्या शतकात बांधले गेलेले हे चर्च जगातील सुंदर वास्तूंपैकी एक मानले जाते. या चर्चाला लागलेली आग इतकी मोठी होती कि शहरभर धूराचे लोट पसरले होते. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र चर्चच्या परिसर पॅरिसचा मध्यवर्ती भाग असल्याने येथे लोकांची गर्दी असते. चर्चला आग लागल्याची कळताच येथील परिसर लगेच मोकळा करण्यात आला होता. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी 'ही इमारत पुन्हा बांधू' असे म्हटले आहे. तर दोन फ्रेंच उद्योग समुहांनी 300 दक्षलक्ष युरोची मदत देऊ केली आहे. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी इतर युरोपियन राष्ट्रांना मदतीचे आवाहन केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे कॅथेड्रल बांधण्यासाठी मदत करू असे म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या प्रवक्त्यांनी छत पूर्णपणे आगीत भस्मसात झाल्याचे म्हटले आहे. इमारतीचे व्हॉल्ट अर्ध नष्ट झाले आहे. 

नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्चच्या दुर्घटनेचे फोटो -
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com