गोव्यात स्ट्राँग रुम जवळच्या इमारतीत आग

गोव्यात स्ट्राँग रुम जवळच्या इमारतीत आग

सासष्टी : दक्षिण गोव्यातील बोर्डा-मडगाव येथील मल्टीपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रयोगशाळेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आज दुपारी आग लागली. या आगीत सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. विद्यालयाजवळील इमारतीत लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघासाठी मतदानाची इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यात आली आहेत.

मल्टीपर्पज विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रयोगशाळेतून आज दुपारी 2.30 च्या दरम्यान धूर येत असल्याचे मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षारक्षकांनी पाहिल्यावर त्यांनी अग्निशामक दलाला त्वरि कळविले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. या आगीत प्रयोगशाळेतील तीन पंखे, रेफ्रिजिरेटर आणि फर्निचर मिळून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.  

विद्यालयाच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी 30 ते 40 मिनटे लागली तर आग आटोक्यात आणण्यासाठी एका बंबचा वापर करण्यात आला. प्रयोगशाळेत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिली. या शिक्षण संकुलाच्या दुसऱ्या इमारतीत मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली असून, ही इमारत आगीपासून सुरक्षित राहिली, असे त्यांनी सांगितले. 

कार्यकरी दंडाधिकाऱ्याकडे स्ट्राँग रुमची (मतदान यंत्रे ठेवलेल्या कक्षाची) जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी त्वरित धाव घेऊन प्रयोगशाळेतील दरवाजा उघडला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सहाय्याने दंडाधिकारी, पोलिस कर्मचारी आपतकालीन विभागाने आग आटोक्यात आणली.

शॉर्टसर्किट झाल्याने ही लागली होती. त्यामुळे इमारतीमधील वीज पुरवठा बंद करण्यात आला. स्ट्राँग रुमजवळ निमलष्करी दल आणि पोलिसांचा कडक पहारा आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com