Bihar Fire : पाटण्यातील हॉटेलला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, 45 रेस्क्यू

आगीनंतर ४५ लोकांना रेस्क्यू करत सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर ३८ लोकांवर पाटणा येथील पीएमसीएच येथे उपचार सुरु आहेत. पाटण्याच्या कोतवाली ठाण्यांतर्गत झालेल्या दुर्घटनेनंतर शहरात गोंधळ उडाला होता.
Bihar Fire
Bihar Fireesakal

Patna Fire News : पाटण्यात गुरुवारी भीषण अग्नितांडव झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सात जण गंभी जखमी झालेले आहेत. जखमींवर पाटण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

या भीषण घटनेत सहा लोकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती पाटण्याचे सिटी एसपी चंद्र प्रकाश यांनी दिली. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पाटणा स्टेशनच्या जवळ पाल हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली, त्यानंतर सिलिंडर फुटल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर चार लोकांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या टीमला मोठे कष्ट घ्यावे लागले. तर अनेक गाड्यांना आग विझवण्यासाठी तसान्तास वेळ द्यावा लागला.

अग्निशमन विभागाच्या डीजी शोभा अहोतकर यासुद्धा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्या म्हणाल्या की, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. जोरदार वारं सुटल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या परिसरात आग पसरु नये यासाठी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

Bihar Fire
Prithviraj Chavan: २०१९ ला नाईलाजास्तव आघाडी केली पण.. पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं सांगलीची सीट सोडण्यामागचे कारण

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीनंतर ४५ लोकांना रेस्क्यू करत सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर ३८ लोकांवर पाटणा येथील पीएमसीएच येथे उपचार सुरु आहेत. पाटण्याच्या कोतवाली ठाण्यांतर्गत झालेल्या दुर्घटनेनंतर शहरात गोंधळ उडाला होता. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com