
A devastating fire engulfs a fireworks factory in Andhra Pradesh’s Konaseema district, resulting in multiple casualties and injuries.
esakal
fireworks factory blast in Andhra Pradesh :आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तर, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी देखील घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री नायडू यांनी आगीच्या घटनेची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे, तसेच, "मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळेल." असंही सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदींनी X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान हे अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्याकरिता मी प्रार्थना करतो."
आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील कोमारीपालेम गावातील एका फटाक्याच्या कारखान्यास दुपारी आग लागली, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यात कामगार फटाके बनवत असताना आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की कामगारांना बाहेर पडता आले नाही.
घटनेनंतर लगेचच पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. जखमींना ताबडतोब राजमहेंद्रवरम सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. प्रशासन आता मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.