बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने पीडितेची गोळ्या घालून हत्या

पीटीआय
शनिवार, 19 जानेवारी 2019

बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय महिलेची आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

गुडगाव : बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय महिलेची आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिला शुक्रवारीच न्यायालयात आपला जबाब देणार होती. मात्र, त्यापूर्वी काही तास आगोदर आरोपीने गोळ्या घालून पीडित महिलेचा खून केला. संदीपकुमार असे आरोपीचे नाव आहे. तो एका नाइट क्‍लबमध्ये बाउंसर म्हणून काम करतो. बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संदीपकुमारने पीडित महिलेचे अपहरण करून तिच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या महिलेने मार्च 2017 मध्ये आरोपीच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 

Web Title: Firing on Rape Victim Women by Rapist